काँग्रेस पक्ष सुरूवातीपासूनच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मुद्द्यावरून भाजपवर टीका करत आला आहे. याच अनुषंगाने मनिष तिवारी यांनी सध्या सुरू असलेल्या नाताळच्या सणाचा दाखला देत मोदी सरकारवर निशाणा साधला. सध्या संपूर्ण जगभरात पांढऱ्या दाढीचा म्हातारा मनुष्य लोकांना पैसे, भेटवस्तू देत फिरत आहे. मात्र, भारतात पांढऱ्या दाढीचा सांताक्लॉज लोकांचे पैसे पळवतो, असे ट्विट करत काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. काँग्रेस पक्ष सुरूवातीपासूनच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मुद्द्यावरून भाजपवर टीका करत आला आहे. याच अनुषंगाने मनिष तिवारी यांनी सध्या सुरू असलेल्या नाताळच्या सणाचा दाखला देत मोदी सरकारवर निशाणा साधला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews